दहावे /तेरावे ला दुखवटा म्हणून कपडे देणे प्रथा बंद….
सटाणा -रेणुका गोंधळी समाज व परशुराम गोंधळी क्रांती सटाणा. संयुक्त विद्यमाने दोन वर्षांपूर्वी 22 मे 2023 रोजी स्व. समाजाचे माजी. अध्यक्ष दिलीप काशीराम धुमाळ यांच्या अंतिम संस्कारावेळी समाजाने एकमताने ठराव मंजूर करण्यात आला होता.समाजात एखादी व्यक्ती स्त्री असो व पुरुष यांचे निधन झाले. त्यांच्या दहावे, तेरावे,उत्तर कार्य,गंध मुक्ती, या दिवशी कपडे स्वरूपात टोपी उपरणे साडी,पॅन्ट पीस,शर्ट पीस निधन झालेल्या व्यक्तीच्या परिवारास देण्यात येतात ते कपडे नंतर कोणीच वापरत नाही. तेच कपडे उपरणे साडी ड्रेस हे काही लोक शुभकार्यात, लग्नात आहेर म्हणून देतात. आपण दुकानात पाच टोपी पाच उपरणे जरी घ्यायला गेलो तरी आपणास 200 रुपये लागतात. साडी कमीत कमी 300 ते 400 रुपये म्हणजे कमीत कमी 1000 रुपये लागतात, टॉवेल उपरणे कोणीच वापरत नाही जे पॅन्ट पीस,शर्ट पीस,दिलेले असतात ते कोणी शिवत नाही,राहिला साडीचा प्रश्न?त्या तर कोणीच वापरत नाही घरात नंतर चार साडीवर एक टफ/ बादली घेतली जाते म्हणजे टफ बादली ची किंमत शंभर रुपये ती आपण चार साडीवर घेतो, म्हणजे त्या दुखवटाच्या साडीची किंमत 25 रुपये….
आपण आणतो 200/300 रुपयाला
मग विचार करा समाज बांधवांनो…
हो!!
ठीक आहे ज्या कुटुंबात कोणाचे निधन झाले त्या कुटुंबातील नातेवाईकांनी सोयरे, मामा, मेव्हणे,यांनी एकत्रित विचार करून दोन-चार जवळचे नातेवाईकांनी दुखवटा म्हणून कपडे घ्यावयाचे बाकीच्या नातेवाईक व समाज बांधवांनी आर्थिक स्वरूपात 100 200 300 400 500 हजार काय जे असेल ते पैशाच्या स्वरूपात दुःखटा म्हणून द्यायचा असे ठरले आहे.
जर समाजातील एखाद्या कुटुंबाची परिस्थिती गरिबीची असली तर त्या कुटुंबास आपण दुखवटा म्हणून दिलेले आर्थिक स्वरूपातील रुपये रक्कम एक मदत पण होऊ शकते कृपा करून सर्व समाज बांधवांना नम्र विनंती आहे की कपडे स्वरूपात दुखवटा देणे ही प्रथा बंद करण्यास सहकार्य करावे…..🙏
कृपा करून लाईक करा शेअर करा आणि आपली प्रतिक्रिया कळवा…. 🙏🙏
आपलेच – रेणुका गोंधळी समाज सटाणा.
परशुराम गोंधळी क्रांती दल सटाणा…