भटके विमुक्त दिवस कळंब मध्ये उत्साहात साजरा
आज कळंब शहरात विमुक्त घुमंतू जनजाती विकास परीषद,(अ.भा.) व भारतीय जनता पार्टी कळंब तालुका च्या वतीने 31 ऑगस्ट “भटके-विमुक्त दिवस” उत्साहात साजरा करण्यात आला,याप्रसंगी भटक्या विमुक्त समुदायातील गोंधळी,वैदू,मसणजोगी,पारधी,नंदिवाले,बहुरूपी,घिसाडी,वंजारी अशा व इतर समाज समुहातील पारंपारिक,शैक्षणीक,सामाजिक अशा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजबांधवांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी विमुक्त घुमंतू जनजाती विकास परीषद मराठवाडा अध्यक्ष संतोष भांडे, भारतीय जनता पार्टीचे कळंब तालुका अध्यक्ष मकरंद पाटील,उपजिल्हाअध्यक्ष शिवाजीराव गिड्डे पाटील,अनेक पदाधिकारी व समाज बांधव उपस्थीत होते.🙏