अकोल्यातील तरुणासह २८ बेरोजगारांची आर्थिक फसवणूक !बनावट पदभरतीः न्यायालयाच्या आदेशानंतर चार जणांविरोधात गुन्हा दाखल
अकोला: नागपूर येथील वेस्टर्नकोलफिल्ड्स लिमिटेड (डब्ल्यूसीएल) मध्ये लिपिक पदावर सरकारी नोकरी लावण्याचे आमिष to दाखवून अकोल्यातील एका युवकासह राज्यभरातील सुमारे २८ बेरोजगारांची आर्थिक फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी चार जणांविरोधात अकोला न्यायालयाने सिव्हील लाइन पोलिसांना भादंवि कलम ४२० (फसवणूक), ४०६ (विश्वासघात), व ४१७ (छळ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला आहे.तक्रारदार मयूर सुनील बाचनवार (२१, रा. जवाहर नगर, अकोला) हे बी.ए. पर्यंत शिक्षण घेतलेले असून स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत. जुलै २०२२ मध्ये त्यांच्या वडिलांचे मित्र अमोल खुळेकर यांच्यामार्फत खुशबू चोंगईवाला (अग्रवाल), आशुतोष चोंगईवाला, गीता चोंगईवाला (सर्व रा. तोष्णीवाल लेआउट, अकोला) व वासुदेव होलमारे (रा. नागपूर) हे त्यांच्या संपर्कात आले. आरोपींनी ‘डब्ल्यूसीएल’ मध्ये लिपिक पदांवर भरती सुरू असल्याचे सांगून नोकरी लावण्यासाठी एकूण २० लाख रुपये लागतील, त्यापैकी आठ लाख रुपये रोख रक्कम म्हणून आणि उर्वरित १२ लाख रुपयांची रक्कम पगारातून कपात केली जाईल, असे आमिष दाखविले. त्यानुसार, मयूरच्या वडिलांनी १८ ऑगस्ट २०२२ रोजी ५ लाख व ८ ऑक्टोबर २०२२ रोजी ३ लाख रुपयेआरोपींच्या निवासस्थानी दिले. ही रक्कम आरोपी क्रमांक २ च्या हातात सोपविण्यात आली होती. त्यानंतर मेसेज व फोन कॉलच्या माध्यमातून काही बनावट भरती प्रक्रिया दाखवून विश्वास निर्माण करण्यात आला. परंतु, प्रत्यक्षात नोकरी लागली नाही. त्यामुळे नोकरीसाठी दिलेल्या फिर्यादीने आरोपींना वारंवार विचारणा केली असता, आरोपींनी फोन घेणे बंद केले व संपर्क टाळला. मयूरने यासंदर्भातील मेसेजेस, कॉल रेकॉर्डिंग, व्हॉट्स अॅप ग्रुपवरील संभाषणे आणि इतर फसवणूक झालेल्या विद्यार्थ्यांची माहिती न्यायालयासमोर सादर केली आहे. विशेष म्हणजे, जेव्हा बाचनवार कुटुंबीयांनी आपली रक्कम परत मागितली, तेव्हा आरोपी क्रमांक २ ने “पैसे मागाल तर आत्महत्या करन व खोटी पोलिस तक्रारी दाखल करेन” अशी धमकी दिली. या प्रकारामुळे घाबरलेल्या तक्रारदाराने येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली. यानंतर न्यायालयाने आरोपी क्रमांक १ ते ४ यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले.सिव्हिल लाईन पोलिस संशयाच्या घेऱ्यातफिर्यादी मयूर बाचनवार याने प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्याकडे धाव घेतल्यानंतर न्यायालयाने याप्रकरणी तातडीने गुन्हा दाखल करण्याचा आदेश २५ मार्च २०२५ रोजी ant सिव्हिल लाईन पोलिसांना दिला होता. त्यानंतर २८ मार्च रोजी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतरही तपास योग्यरीत्या होत नसल्याचे पाहून फिर्यादीने १० जून २०२५ रोजी पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केली. तपासाला होणारी दिरंगाई लक्षात घेता सिव्हिल लाईन पोलिस संशयाच्या घेऱ्यात सापडले आहेत.बनावट जाहिराती, व्हॉट्सअॅप ग्रुपचा वापरफसवणुकीत सहभागी असलेले आरोपी संबंधित बेरोजगार युवकांना नागपूर येथे घेऊन जाऊन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या क्वार्टर्समध्ये १५-१५ दिवस ठेवत होते. तरीही युवकांची कोणतीही नियुक्ती झाली नाही.२ नोकरीच्या अपेक्षेने राज्यभराच्या कानाकोपऱ्यातून एकत्र आलेल्या सुमारे २८ तरुणांचा आरोपींनी व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केला होता. त्या माध्यमातून खोट्या जाहिराती दाखवत कागदपत्रांची मागणी केली जात होती.२० लाखरुपयांची मागणीनोकरी लावण्यासाठी एकूण २० लाख रुपये लागतील, त्यापैकी आठ लाख रुपये रोख रक्कम म्हणून आणि उर्वरित १२ लाख रुपयांची रक्कम पगारातून कपात केली जाईल, असे आमिष दाखविले.