Thursday, September 11, 2025
Google search engine

 

आठ वर्षाशी भटकलेली मुलगी कुटुंबात सुखरूप 

महिला कर्मचारी उपलब्ध नसल्याने मूर्तिजापूर येथील गुप्ता परिवारातील प्रवासी यांनी मुलीला पोलीस स्टेशन मूर्तिजापूर शहर येते आणले.

अकोला : सविस्तर माहिती अशी की, ॲसेस टु जस्टीस प्रकल्प आय. एस. डब्ल्यू एस. अकोला व चाईल्ड लाईन 1098 यावर रात्रीचे 1.30 वा. माहिती प्राप्त झाली की, एक 8 वर्षाची मुलगी विनापालक रेल्वेस्थानक मूर्तिजापूर येथे भटकताना दिसून आली. तेव्हा रेल्वे पोलीस स्टेशन मूर्तिजापूर येथे महिला कर्मचारी उपलब्ध नसल्याने मूर्तिजापूर येथील गुप्ता परिवारातील प्रवासी यांनी मुलीला पोलीस स्टेशन मूर्तिजापूर शहर येते आणले. याबाबत माहिती अध्यक्ष बाल कल्याण समिती अकोला च्या अनिता शिंदे यांना देवून त्यांच्या आदेशाने ॲसेस टु जस्टीस प्रकल्प आय. एस. डब्ल्यू एस. अकोला चे जिल्हा प्रकल्प समन्वयक शंकर वाघमारे, समन्वयक सपोर्ट पर्सन सपना गजभिये, चाईल्ड लाईन टीम यांनी पोलीस स्टेशन ला जाऊन मुलीचे समुपदेशन केले असता माहिती मिळाली की, मुलीगी तिचे नातेवाईकांसोबत रात्रीच्या वेळी सेवाग्राम एक्सप्रेस नी प्रवास करताना भटकली व मूर्तिजापूर रेल्वे स्थाणकावर झोपेत असताना उतरली. त्यानंतर मुलीची वैधकीय तपासणी उपजिल्हा रुग्णालय मूर्तिजापूर येथे करुन काळजी व संरक्षणाच्या दृष्ठीकोनातून बालिकेला बाल कल्याण समिती येथे आणले. त्यानंतर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक पवार यांच्या सोबत टीम ने चर्चा करुन व मुलीकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे मुलीच्या आई वडिलांचा शोध घेणे सुरु केला. तसेच पोलीस चाईल्ड मिसिंग ग्रुप वर माहिती पाठवताच धामणगाव येथून जिल्हा समन्वयक शंकर वाघमारे यांना कॉल आला की, सदर बालिका ही चिंचोली ता. धामणगाव जिल्हा अमरावती येथील असल्याचे समजले तेव्हा तात्काळ मुलीचा आई वडिलांन सोबत संपर्क करुन त्यांना मुलगी सुखरूप अकोला येथे असल्याचे सांगितले व मुलीचे आई वडील व नातेवाईक मुलीला घेण्यासाठी बालकल्याण समिती अकोला येते आले असता माहिती समोर आली की, गरिबी व कोणतेही कामधंदे नसल्याने लोहाराचे काम करण्यासाठी या गावातून त्या गावी मुलांना सोबत घेऊन कामाच्या शोधात भटकावे लागते. व नेहमी कामाच्या शोधात स्थलांतर रहावे लागते. अशी माहिती प्राप्त झाली. त्यामुळे प्रवास करताना मुलगी भटकल्याचे समजले. त्यानंतर बाल कल्याण समिती अकोला समोर मुलगी व पालक यांची ओळख पटल्याने मुलीला आई वडिलांच्या सुखरूप स्वाधीन करण्यात आले. सदर प्रकरणात बाल कल्याण समिती अकोला च्या अध्यक्ष अनिता गुरव, सदस्य राजेश देशमुख, प्रांजली जयस्वाल, शिला तोषणीवाल, विनय दांदळे, पोलीस निरीक्षक अजित जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल पवार, पो. कॉ. नामदेव आडे, पवन बोडखे, म. पो. कॉ. अंकिता घाटे, वनिता चव्हाण, रंजना उंबरकर, ॲसेस टु जस्टीस प्रकल्प आय. एस. डब्ल्यू. एस चे जिल्हा प्रकल्प समन्वयक शंकर वाघमारे, समन्वयक सपोर्ट पर्सन सपना गजभिये, रेल्वे चाईल्ड लाईन चे पद्माकर सदानशिव, अपर्णा सहारे यांनी मोलाचे कार्य केले

सौ वनिता येवले
सौ वनिता येवलेhttp://mahilarakshak.in
सर्व महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला वाचा फोडण्याकरिता व त्यांच्यावरील अन्याय चे निवारण व्हावे तसेच पीडित महिलांना न्याय मिळावा व त्यांच्यावरील अन्याय याला वाचा फोडणे या महिला रक्षक डिजिटल न्यूज पोर्टल च्या माध्यमातून आम्ही आपल्यापर्यंत कानाकोपऱ्यात पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहो आपण महिलांवरील अत्याचार व अन्याय दूर व्हावा याकरिता आपण खालील नंबर वर बातम्या पाठवू शकता 8956424320.8007044951
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments