
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शोभायात्रेचे आ. पठाण यांनी केले स्वागत
अकोला : प्रजाहितदक्ष, कुशल प्रशासक, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त निघालेल्या दोन वेगवेगळ्या मिरवणुकीचे राजेश्वर मंदिर जवळ आणि निशांत टॉवर चौकात अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आ. साजिद खान पठाण यांनी अभिवादन करीत स्वागत केले.
राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त शनिवारी सायंकाळी शहरातून दोन वेगवेगळ्या भव्य शोभायात्रा काढण्यात आल्या. या शोभायात्रेत समाजबांधवांनी आपला मोठा सक्रीय सहभाग नोंदविला. यावेळी अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार साजिद खान पठाण यांनी प्रथम राजराजेश्वर मंदिर चौकात एका मिरवणुकीचे स्वागत केले तर दुसऱ्या मिरवणुकीचे स्वागत निशांत टॉवर चौकात केले. यावेळी त्यांनी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी त्यांच्या समवेत काँग्रेसचे आकाश कवडे, राहुल सारवान, अंकुश तायडे, अभिजित तवर, संतोष निदाने यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.