बार्शिटाकळी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील २२ वर्षीय विवाहित महिलेला मूलबाळ होत नसल्याने फूस पळवून तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली
बार्शिटाकळी : बार्शिटाकळी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील २२ वर्षीय विवाहित महिलेला मूलबाळ होत नसल्याने फूस पळवून तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, बार्शिटाकळी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका २२ वर्षीय विवाहित महिलेने फिर्यादीत दिलेल्या बयानात इंस्टाग्रामवर दोन महिन्यापूर्वी ज्योती नागेश हिवराळे (२३) रा. बोथा काजी तालुका खामगाव यांच्याशी ओळख झाली. सदर फिर्यादी महिलेस मूलबाळहोत नसल्याने आसरा संस्थान दोनद
येथे नवसाच्या नावाखाली फूस लावून चार चाकी वाहनातून सुरेश महादेव पाचपोर (२३) रा. दाथुलगाव तालुका जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा व नागेश हिवराळे (२३) रा. बोधाकाजी तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा यांनी नेले. सदर फिर्यादी महिला गुंगीचे औषध देऊन तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यानंतर आरोपी त्यांनी सदर महिलेला पुणे जिल्ह्यातील आळंदी येथील एका लॉजवर घेऊन गेले तेथून नागेश हिवराळे व ज्योती नागेश हिवराळे तेथून निघून आले. यातील सुरेश महादेव पाचपोर याने गुंगीचे औषध देऊन सतत तीन दिवस फिर्यादी महिलेशी शारीरिक संबंध ठेवले, अशा तक्रारीनुसार आरोपी सुरेश महादेव पाचपोर, ज्योती नागेश हिवराळे व नागेश हिवराळे यांचेवर कलम ६३, १२३, १३८, १४२, ३(५) भारतीय न्याय संहिता नुसार गुन्हा दाखल करण्यात आला, असून सदर घटना ५ मे ते ९ मे याकालावधीत घडली. याबाबत १३ मेला सदर फिर्यादी महिलेची बार्शिटाकळी पोलिसात जबानी फिर्याद दाखल झाल्यानंतर ठाणेदार दिपक वारे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ वेगाने सूत्रे हलवून हे. कॉ. नागसेन वानखडे, मनीष घुगे, ईश्वर पातोड यांना चौकशी करिता नेमून आरोपीचा शोध घेतला असता सदर आरोपीला सहा तासातच अटक करण्यात आली असल्याचे यावेळी सांगितले.