लहुजी शक्ती सेनाच्याअकोला जिल्हाध्यक्षपदी श्री मुकिंदा अंजनकर
अकोला:- लहुजी शक्ती सेना तेल्हारा तालुका व शहर च्या वतीने दिनांक ९ मे रोजी विश्रामगृह तेल्हारा येथे बैठकीचे आयोजन महाराष्ट्र राज्याचे महासचिव श्री वामनराव भिसे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले प्रमुख पाहुणे म्हणून पश्चिम विदर्भ महासचिव श्री प्रकाश भाऊ दांडगे नवनिर्वाचित अकोला जिल्हाध्यक्ष श्री मुकिंदा उर्फ पिंटू अंजनकर अकोला जिल्हा सचिव श्री नागोरावजी वानखडे अकोट शहर महिला आघाडी अध्यक्ष सौ सारिका ताई स्वर्ग हे होते सर्वप्रथम तेल्हारा तालुकाध्यक्ष श्री गणेश भाऊ सोनोने यांनी प्रमुख पाहुण्याचे स्वागत केले बैठकीमध्ये मातंग समाजाच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर व होऊ घातलेल्या ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकी संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली या निमित्य नवनिर्वाचित अकोला जिल्हाध्यक्ष श्री मुकिंदा उर्फ पिंटू अंजनकर यांचे शाल व श्रीफळ देऊन तालुक्याचे वतीने स्वागत करण्यात आले याप्रसंगी तालुक्यातील रिक्त पदे भरण्यात आले प्रामुख्याने तेलारा तालुका उपाध्यक्ष श्री शंकरराव हिवराळे रा. काळेगाव, श्री काशिनाथ साबळे रा. रायखेड महासचिव श्री अनिल सोनवणे रा. भोकर सचिव प्रकाश हंगामे रा. काळेगाव, श्री सत्यपाल सोनोने, संघटक श्री देविदास देवकुळे रा. रायखेड तेल्हारा तालुका युवक आघाडी अध्यक्षपदी श्री अनिकेत मिरगे रा. भोकर यांची सर्व नुमते नियुक्तीपत्र देऊन नियुक्ती करण्यात आली बैठकीला तालुक्यातील बहुसंख्य समाज बांधव उपस्थित होता असे तालुका महासचिव श्री अनिल सोनोने यांनी कळविले.