अकोला जुन्या शहरात वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यास संदर्भात या संदर्भात सखोल अभ्यास करून वीज वितरण अधिकारी यांनी यासंदर्भात राज्य शासनाकडे निधी साठी पाठपुरावा करू वीज पुरवठा वारंवार खंडित होऊन देत नागरिकांना त्रास होणार नाही यासंदर्भातला नियोजन त्वरित करा अशा सूचना अधीक्षक अभियंता नाईक तसेच दिनोरे यांना आमदार रणधीर सावरकर यांनी दिल्या.
जुना शहरात वारंवार वीजस पुरवठा खंडित होत असल्याची तक्रारी संदर्भात आमदार सावरकर यांनी धर्मवीर धर्म रक्षक संभाजी महाराजांच्या शोभायात्रेमध्ये शामिल असताना त्यांना या संदर्भात माहिती मिळाल्याबरोबर तसेच भाजपाचे सक्रिय पदाधिकारी सिद्धार्थ शर्मा यांनी सुद्धा संपर्क केल्यावर त्यांनी ताबडतोब अधिकाऱ्यांना निर्देश दिले तसेच एप्रिल महिन्यात झाडे का कापण्यात आले नाही असाही सवाल करून देखभाल दुरुस्तीच्या नावावर वारंवार वीस पुरवठा खंडित करण्याचा प्रकार का होत आहे असाही सवाल त्यांनी केला असून यासंदर्भात अधिकारी वर्ग सर्वसामान्य नागरिकांना उत्तर देत नाही उलट फ्युज कॉल सेंटर वर संपर्क करा अशी उत्तर देऊन लाईन केव्हा येणार आम्हाला माहित नाही सुट्टीवर आहो कामावर नाही असे प्रकारचे उत्तर देऊ आपली जबाबदारी झटका पासून नागरिकांना त्रास देण्याचा प्रकार होत असल्याचा प्रकार सुद्धा तक्रारी आले आहेत या संदर्भात कंपनीने नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही राज्याचे मुख्यमंत्री हे ऊर्जामंत्री असून गंभीर प्रकार सहन केल्या जाणार नाहीऔ ग्रामीण आणि शहरी भागामध्ये पावसाळ्याच्या दिवसांमध्ये यंत्रणा सुसज्ज ठेवण्याची गरज आहे तसेच जुन्या शहरातला कायमचा प्रश्न निकाली काढण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात याव्या अशा सूचना आमदार सावरकर यांनी दिल्या.