रेल्वे प्रशासनाची धडक कारवाई, कोट्यवधींची भूमी मुक्त
अकोला : भुसावळ विभागानेअकोला रेल्वे स्थानकाच्या परिसरातील गौतमवाडी, आपातापा रोड आणि चिखलपुरा खरप रोड या भागांमध्ये गेल्या २५ वर्षींपासून असलेले ८६ अनधिकृत बांधकामे गुरुवारी, ९ मे २०२५ रोजी जमीनदोस्त केले. या कारवाईमुळे रेल्वेची तब्बल ४० हजार चौरस मीटर म्हणजेच सुमारे १० कोटी रुपये मूल्याची भूमी अतिक्रमणमुक्त झाली आहे. असा दावा रेल्वेने केला आहे. दरम्यान, या भागात विकास कामे२५ वर्षांचे अनधिकृत बांधकाम भुईसपाटकुठल्या निधीतून केल्या गेली आणि कोणी केली असा प्रश्न अनुत्तरीत असून अतिक्रमित जागांवर विकास कामे, रस्ते कसे काय केले गेले याचाशोध जिल्हा प्रशासनाने घेण्याची गरज आहे.रेल्वेच्या अभियांत्रिकी आणि रेल्वे सुरक्षा दलाच्या ही संयुक्त मोहीमराबविली. या कारवाईच्या वेळी शहर पोलीस आणि महावितरण यांचा सक्रिय सहभाग होता. गेल्या दोन दशकांहून अधिक काळापासून रेल्वेच्या विकासाच्या मागीत असलेला हा अडथळा अखेर दूर झाला आहे. अकोला रेल्वे स्थानकाच्या परिसराच्या भविष्यातील विकासाला नवी गती मिळणार आहे, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. ही कारवाई केवळ अतिक्रमणे हटवणारी नसून रेल्वेच्या संपत्तीचे संरक्षण आणि शहराच्या प्रगतीसाठी उचललेले महत्त्वाचे पाऊल आहे. असा दावा रेल्वेने केला आहे.