Thursday, September 11, 2025
Google search engine
Homeमहत्वाचेकेवायसी लिंकवर क्लिक केले; आरोग्यसेविकेने सहा सहा लाख गमावले 

केवायसी लिंकवर क्लिक केले; आरोग्यसेविकेने सहा सहा लाख गमावले 

 

केवायसी लिंकवर क्लिक केले; आरोग्यसेविकेने सहा सहा लाख गमावले

अकोला : पतीच्या अपघाती मृत्यूनंतर विमाकंपनीकडून मिळालेली रक्कम एका आरोग्यसेविकेला सायबर फसवणुकीच्या माध्यमातून गमवावी लागल्याची घटना शहरात घडली. खडकी परिसरातील ३६ वर्षीय महिलेची बनावट केवायसी लिंकद्वारे तब्बल ६ लाख १६ हजार रुपयांनी फसवणूक झाल्याचा प्रकार उजेडात आला. याप्रकरणी खदान पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यातआला आहे.याप्रकरणी खदान पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आला करण्यात आहे.तक्रारीनुसार, पीडित महिला आरोग्य विभागात कार्यरत आहेत. त्यांच्या पतीचे ३ जुलै २०२३ रोजी अपघाती निधन झाले होते. पतीच्या नावे असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र, खडकी शाखा येथील खात्यावर विमा कंपनीने ६.६५ लाख रुपये जमा केले होते. १० एप्रिल २०२५ रोजी त्यांनी बँकेत जाऊन केवायसी फॉर्म भरून दिला होता. १७एप्रिलला दुपारी त्यांना अनोळखी मोबाईल क्रमांकावरून केवायसी अपडेटच्यानावाखाली एक लिंक असलेला मेसेज आला. केवायसी प्रक्रियेचा भाग समजून त्यांनी ती लिंक उघडली, परंतु कोणतीही माहिती न दिसल्याने त्वरित ती बंद केली. त्यानंतर संध्याकाळी साडेसात वाजता त्यांच्या मोबाईलवर आलेल्या सूचनेत तीन वेगवेगळ्या ट्रॅन्झेक्शनद्वारे एकूण ६.१६ लाख रुपये काढल्याचे समोर आले. निमनगरघटनेची तक्रार खदान पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी ‘अज्ञात व्यक्तीविरोधात माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६ (ड) व भारतीय दंडसंहितेच्या कलम ३१८ (४) अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे.

सौ वनिता येवले
सौ वनिता येवलेhttp://mahilarakshak.in
सर्व महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला वाचा फोडण्याकरिता व त्यांच्यावरील अन्याय चे निवारण व्हावे तसेच पीडित महिलांना न्याय मिळावा व त्यांच्यावरील अन्याय याला वाचा फोडणे या महिला रक्षक डिजिटल न्यूज पोर्टल च्या माध्यमातून आम्ही आपल्यापर्यंत कानाकोपऱ्यात पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहो आपण महिलांवरील अत्याचार व अन्याय दूर व्हावा याकरिता आपण खालील नंबर वर बातम्या पाठवू शकता 8956424320.8007044951
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments