चाळीसगावात १५ शिक्षकांची तब्बल ९७ लाखांत फसवणूकचाळीसगावातील तीन जणांविरुद्ध गुन्हा, संस्थेच्या सचिवास अटक
(अमोल इंगळे यांच्याकडून )चाळीसगाव : येथील जयहिंद शाळेतीलतब्बल १५ शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पगारातून ९७ लाखांची रक्कम कपात करून फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सचिव व मुख्याध्यापकासह तीन जणांविरुद्ध शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात संस्था सचिवास अटककरण्यात आली असून त्याला सात दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली.
गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये संस्थेचे सचिव अशोक हरी खलाणे (रा. नेताजी चौक, चाळीसगाव), मुख्याध्यापक अभिजित जगन्नाथ खलाणे (रा. धुळे रोड, चाळीसगाव) व लिपीक ज्ञानेश्वर दगा महाजन (रा. तेजस कोणार्क, धुळे रोड, चाळीसगाव) यांचा समावेश आहे. यात शिक्षणसंस्थेतील सर्व कामकाज पाहणारे सचिव खलाणे यांना अटक झाली.नोकरीवरून काढून टाकण्याची धमकीजय हिंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाती शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे शासनाकडून येणाऱ्या पगाराच्या अनुदानातून सचिव, मुख्याध्याप व क्लर्क यांनी काही शिक्षकांना नोकरीवरून काढू टाकण्याची धमकी दिली. एवढेच नाही तर १५ शिक्षकांच्या पगारातून वर्ष २००६ ते २०२४ या कालावधीत रक्कम कपात केली. याबाबत शिक्षकांनी शिक्षण संचालकांकडे केली होती. त्यांनी केलेल्या चौकशीत सत्यता आढळून आल्याने विस्तार अधिकारी विलास आनंदा भोई (५० रा. तिडकेन नाशिक) यांनी फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा दाखल झाला. यात सचिव अशोक खलाणे यांना शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता अटक करण्यात आली.