Thursday, September 11, 2025
Google search engine
Homeमहत्वाचेएक लाख ६० हजार देऊन लग्न केले अन् वधू पसार दागिनेही गायबवराची...

एक लाख ६० हजार देऊन लग्न केले अन् वधू पसार दागिनेही गायबवराची २ लाख ४४ हजारांत फसवणूक

एक लाख ६० हजार देऊन लग्न केले अन् वधू पसार दागिनेही गायबवराची २ लाख ४४ हजारांत फसवणूक

जळगाव : एजंटच्या मध्यस्थीनेएक लाख ६० हजार रुपये देऊन मुलाचे लग्न केले, मात्र लग्नाच्या तिसऱ्या दिवशी वधू दागिन्यांसह रात्रीतून पसार झाली. यामध्ये वराकडील मंडळींची दोन लाख ४४ हजार रुपयांमध्ये फसवणूक करण्यात आली. हा प्रकार १४ ते २३ फेब्रुवारी दरम्यान घडला.याप्रकरणी १३ मार्च रोजी एमआयडीसी पोलिस ठाण्यात वधूसह एजंट व इतर दोघे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामेश्वर कॉलनी परिसरात २७ वर्षीय रिक्षाचालक तरुण आई, वडील, आजीसह राहतो. त्याच्या आईने बऱ्हाणपूर येथील आशाबाई (पूर्ण नाव समजू शकले नाही) नावाच्या एजंट महिलेशी संपर्क साधला. तिने पूजा गंगाराम गावडे (रा. पिपरी महेपाल, समरडक, ता.जि. यवतमाळ) ही लग्नाची मुलगी८४हजार रुपयांचे दागिने सासूने लग्नात वधूला घातले होतेतरुणाच्या आईने मणी-मंगळसूत्र, कर्णफुले, सोनपोत आदी दागिने लग्नामध्ये वधूला घातले होते. मात्र ८४ हजार रुपयांचे दागिने घेऊन वधू पसार झाली. पत्नी परत येत नसल्याने व पैसे, दागिनेही गेल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने तरुणाने एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. एजंट आशाबाई, पूजा गावडे, निर्मलाबाई डोंगरे, शिवशंकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोउनि अशोक काळे करीत आहेत.

असून तिचा फोटो पाठविला. लग्नाची बोलणी पक्की झाली व एजंट महिलेला एक लाख ६० हजार रुपये देण्याचा व्यवहार ठरला. १९ फेब्रुवारीला पूजाचे रामेश्वर कॉलनीतील तरुणाशी लग्न लावून दिले. त्यानंतर एक लाख ६० हजार रुपये घेऊन वधू वगळता इतर जण निघून गेले. दि. २२ फेब्रुवारी रोजी, पूजा घरातून निघून गेल्याचे तरुणाच्या लक्षात आले. शोध घेऊनही पूजा सापडली नाही.

सौ वनिता येवले
सौ वनिता येवलेhttp://mahilarakshak.in
सर्व महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला वाचा फोडण्याकरिता व त्यांच्यावरील अन्याय चे निवारण व्हावे तसेच पीडित महिलांना न्याय मिळावा व त्यांच्यावरील अन्याय याला वाचा फोडणे या महिला रक्षक डिजिटल न्यूज पोर्टल च्या माध्यमातून आम्ही आपल्यापर्यंत कानाकोपऱ्यात पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहो आपण महिलांवरील अत्याचार व अन्याय दूर व्हावा याकरिता आपण खालील नंबर वर बातम्या पाठवू शकता 8956424320.8007044951
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments