एसी मुळे लागली आग
अकोला स्थानिक मुकुंद नगर गजानन महाराज मंदिरा मागे असलेले एका घराला आज सकाळी अचानक आग लागली असून या घटनेमुळे परिसरात एकच धावपळ उडाली होती परिसरात रहिवासी असलेले मनीषा गावंडे हे आर्किटेक असून आज सकाळी ते काही कामानिमित्त बाहेर गेले असता त्यांच्या घरातील बेडरूम मधील एसी मध्ये अचानक शॉट सर्किट झाले त्यावेळी बेडरूम मधील एसी ने पेट घेतला यावेळी बेडरूम मधील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले स्थानिक नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला परंतु आग मोठ्या प्रमाणात असल्याने अग्निशमन विभागाला प्राचार्य करण्यात आले अग्निशमन विभागाने घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली असून या घटनेमध्ये मनीषा गावंडे यांचे लाखोचे नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे नेमकी आज कशामुळे लागली याबाबत सिव्हिल लाईन पोलीस तपास करीत आहे