> *संत गजानन महाराजानी राम भक्ती श्रद्धा विश्वास सोबत अन्नाचं महत्त्व मानवी जीवनात येणारे संकट कसे दूर व्हावे आपल्या लीलाच्या माध्यमातून भक्तांना दिले – आ. सावरकर
> *माऊली कृपा व माऊली स्वाती पर्यटन केंद्रा च्या वतीने दहिगाव गावंडे ते शेगाव पायदल वारी पालखींचे वारकऱ्यांचे स्वागत पूजन कार्यक्रमाचे आयोजन*
अकोला : विदर्भाची पंढरी व भक्तांची मनोकामना पूर्ण करणारे अवलिया संत गजानन महाराज यांनी राम भक्ती श्रद्धा विश्वास सोबत मानवतेचा अन्नदानाचा महत्त्व अन्नाचं महत्त्व मानवी जीवनात येणारे संकट कसे दूर व्हावे याचा आपल्या लीलाच्या माध्यमातून भक्तांना दिले आहे समाधी संजीवनी च्या माध्यमातून भक्तांच्या इच्छापूर्ती करणाऱ्या विदर्भाची माऊली गजानन महाराजांच्या पायदलवारी, जाणाऱ्या भक्तांना नमन एवढ्या थंडीमध्ये सातत्याने पंधरा दिवस धर्म आणि राष्ट्रासाठी देणाऱ्या सनातन प्रेमी सध्याच्या काळामध्ये दुर्मिळ होत असताना अशा पद्धतीने समाजात चेतना जागृती करणाऱ्या परंपरेला वृद्धीगत करणाऱ्या भक्तांचा स्वागत करणे त्यांना नमन करणे हे आपले कर्तव्य असल्याचे, प्रतिपादन भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी केले.
गायगाव येथे दहिगाव गावंडे ते शेगाव पायदल वारी पालखींचे वारकऱ्यांचे स्वागत पूजन करताना ते बोलत होते माऊली कृपा व माऊली. स्वाती पर्यटन केंद्र च्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी आमदार सावरकर यांनी पालखीचे पूजन करून वारकऱ्यांचे स्वागत केले गायगाव येथे दहिगाव गावंडे ते शेगाव पायी दिंडीचे स्वागत केले. सरपंच संजय पाटील गावंडे पुरण पाटील,शरद पाटील,
पाचपोर साहेब,वाघमारे साहेब, साबळे साहेब शंकरराव वाकोडे,अंबादास उमाळे माधव मानकर आदी उपस्थित होते.